Sun, Jul 05, 2020 05:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पनवेल :जवानांची रिक्षा चालकाला मारहाण

पनवेल :जवानांची रिक्षा चालकाला मारहाण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पनवेल : प्रतिनिधी 

तळोजा परिसरात एका जवानांनी रिक्षा चालकाला घरात घुसून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. तळोजा येथील रॅपिड ॲक्‍शन फोर्सच्या जवानांनी ही मारहाण केली असल्याची घटना सीसीटीव्‍ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. ही घटना तळोजा परिसरात बुधवारी ७ वाजून ३० मिनिटांनी घडली. या मारहाणीत रिक्षा चालक जखमी झाला असून त्याच्यावर खारघर येथे 00 उपचार सुरु आहेत. सुनील पाटील असे या रिक्षा चालकाचे नाव आहे

रिक्षा चालक सुनील पाटील नेहमीप्रमाणे तळोजा रेल्वे स्थानक परिसरात रिक्षाचा व्यवसाय करत होता. यावेळी तळोजा फेज वनमधील रॅपिड ॲक्‍शन फोर्सचाचा जवान जात असताना दोघांमध्ये धक्का लागून बाचाबाची सुरु झाली. यानंतर जवानांनी आपल्या सहकारी मित्रांना बोलावून रिक्षाचालकाच्‍या घरात घुसून मारहाण केली.