होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सिनेमे दाखवायच काम तुमचं, खाद्यपदार्थ विकायच काम नव्हे : उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे

खाद्यपदार्थ विकणं तुमचं काम नव्हे : हायकोर्ट

Published On: Aug 08 2018 2:31PM | Last Updated: Aug 08 2018 9:03PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

मल्टिप्लेक्स असोसिएशनवर मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. सिनेमा दाखवणे तुमचे काम आहे, खाद्यपदार्थ विकण्याचे काम तुमचे नाही, अशा शब्दात असोसिएशनची कानउघडणी न्यायालयाने केली. दरम्यान राज्य सरकारने घेतलेल्या यु टर्नवर सुद्धा न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. 

मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय मागे घेण्यासाठी न्यायालयाने आदेश दिले होते. त्यानुसार अंमलबजावणी सुद्धा करण्यात आली पण सरकारने पुन्हा यु टर्न घेत सुरक्षेचे कारण पुढे केले व बंदीला योग्य ठरवले. 

 'घरातील किंवा बाहेरून आणलेल्या खाद्यपदार्थांवर बंदी घालत तुम्ही लोकांना आरोग्यदायी अन्न सोडून जंक फूड खायला भाग पाडत आहात, अशा शब्दात उच्च न्यायालयाने मल्टिप्लेक्स असोसिएशनची कानउघडणी केली. सार्वजिनक ठिकाणी लोक घरातील पदार्थ आणून खातात वेळी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत नाही का,  केवळ सिनेमागृहात घरचे पदार्थ खाण्यास बंदी का असा सवाल न्यायालयाने केला. 

कायदा आणि सुव्यवस्था कुणीही हातात घेऊ नये, त्यासाठी पोलिस व प्रशासन सक्षम असल्याचे सांगत न्यायालयाने मनसेलाही फटकारले.