Tue, Apr 23, 2019 13:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संघटनेचे वेतननिश्‍चिती सूत्र एसटीने फेटाळले

संघटनेचे वेतननिश्‍चिती सूत्र एसटीने फेटाळले

Published On: Jun 25 2018 1:49AM | Last Updated: Jun 25 2018 1:21AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्य परिवहन महामंडळाने कर्मचार्‍यांसाठी जाहीर केलेल्या 4 हजार 849 कोटी रुपयांच्या वेतनवाढीचे सूत्र महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटना या मान्यताप्राप्त युनियनने चुकीच्या पद्धतीने मांडल्यामुळे एसटी प्रशासनाने ते फेटाळले आहे. त्यामुळे कामगारांची वेतनवाढ लटकण्याची शक्यता आहे.

महामंडळाच्या स्थापनेपासून कॉस्ट टू कंपनी (सीटीसी) अंतर्गत कर्मचार्‍यांवरील खर्च हा कराराच्या एकूण रकमेत पकडण्याची पद्धत आहे. ही रक्कम भविष्य निर्वाह निधी, उपदान व रजा रोखीकरणासाठी वापरली जाते. त्यामुळेच कामगारांना निवृत्तीनंतरचे लाभ मिळतात. पूर्वी ही रक्कम17.5 टक्के इतकी होती. शासकीय लेखा परीक्षण अधिकार्‍यांनी त्यामध्ये वाढीचा शेरा मारल्याने ती 28.5 टक्के करण्यात आली. 

कर्मचर्‍यांचा संप मागे घेण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मान्यताप्राप्त युनियनसह इतर संघटनांच्या नेत्यांसोबत बैठक घेतली होती. महामंडळाच्या वेतनवाढीचे सूत्र आम्ही तयार करून देतो, त्यामध्ये वाढ केली जाणार नाही, असे आश्‍वासन संघटनेच्या नेत्यांनी होते. सीटीसीअंतर्गत रक्कम कमी किंवा रद्द करण्याविषयी रावते यांनी आश्‍वासन दिले नव्हते. युनियनने सीटीसीची रक्कम वगळून केलेले सूत्र सादर करण्यात आले आहे. 

त्यानुसार सध्याचा 4 हजार 849 कोटी रुपयांच्या वेतनवाढीमध्ये वर्षाला 650 कोटी तर चार वर्षाला 2400 कोटींची भर पडणार आहे. त्यामुळे एसटीचा पगारापोटीचा खर्च 60 टक्क्यांवरून 72 टक्क्यांपर्यंत पोहचेल.