Mon, Jun 17, 2019 02:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबई आयुक्‍त हेमंत नगराळेंच्या निलंबनाचे आदेश

नवी मुंबई आयुक्‍त हेमंत नगराळेंच्या निलंबनाचे आदेश

Published On: Mar 21 2018 2:19AM | Last Updated: Mar 21 2018 2:10AMमुंबई : प्रतिनिधी 

रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देणारे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त  हेमंत नगराळे आणि  उपायुक्त तुषार दोषी  यांच्यावर निलंबनाची कारवाई करून या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधानपरिषदेत दिले.

रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेतून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही म्हणून शिवराज भोसले यांना सहकार कायदा कलम 101 अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे. बँकेकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी भोसले यांनी आपल्या विरोधातच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून नवी मुंबईचे पोलीस आयुक्त व उपायुक्त यांच्या आदेशावरून पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकार्‍यांना निलंबित करून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेकापचे जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत केली. या प्रकाराची गंभीर दखल घेत सभापतींनी संबंधित पोलीस अधिकार्‍यांना निलंबित करून चौकशी करण्याचे निर्देश दिले.