Thu, Nov 15, 2018 09:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

Published On: Mar 19 2018 1:47AM | Last Updated: Mar 19 2018 1:16AMमुंबई : प्रतिनिधी

भांडुप येथे एकाच कुटुंबातील तिघांवर तीनजणांच्या एका टोळीने तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक  हल्ला केल्याची  घटना घडली. यात अब्दुल गनी खान  या 50 वर्षांच्या व्यक्तीसह त्याची मुले शादाब अब्दुल गनी खान, शाबाज अब्दुल गनी खान यांचा मृत्यू झाला. फेरीवाल्यांना विरोध केल्याने हा  प्रकार घडल्याचे समोर येत आहे.

फरार आरोपी अझिम कुरेशी, नवाब कासीम, कासीमभाई यांच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे. आरोपींविरोधात भांडुप पोलिसांनी हत्या आणि हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता भांडुप येथील सोनापूर, झकेरिया मशिदीजवळील झकेरिया कंपाऊंडमध्ये घडली. 

याच ठिकाणी अब्दुल गनी खान हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांचा घरातच भंगाराचा व्यवसाय असून दोन्ही मुले व्यवसायात त्यांना मदत करतात. त्यांच्या घरासमोरच काही फेरीवाले हातगाडी लावत असल्याने अब्दुल खान यांनी संबंधित फेरीवाल्यांना विरोध केला होता. त्यातून त्यांच्यात सतत खटके उडत होते. 

रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता तिथे काही काही फेरीवाल्यांनी आपली हातगाडी लावली होती, त्यावरुन त्यांच्यात पुन्हा शाब्दिक बाचाबाची झाली होती. यानंतर तीनजणांच्या टोळीने अब्दुल खान व त्यांच्या दोन्ही मुलांवर घातक शस्त्रांनी वार केले होते. 

भांडुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मुलुंडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.  शाबाज याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी तिहेरी हत्या आणि हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंद केला आहे. या घटनेने रहिवाशांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे.