Fri, Jul 19, 2019 17:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण-मलंग रस्त्यावर चौथा बळी

कल्याण-मलंग रस्त्यावर चौथा बळी

Published On: Jul 11 2018 6:16PM | Last Updated: Jul 11 2018 6:16PMकल्याण : वार्ताहर 

कल्याण-मलंग रोड वरील द्वारली गावाजवळ रस्त्यावरील खड्ड्यात पाय घसरून पडल्‍यानंतर ट्रकने चिरडल्‍याने एकाचा मृत्‍यू झाला आहे. अण्णा (पूर्ण नाव समजले नाही ) असे मृत्‍यू झालेल्‍या व्यक्‍तीचे नाव आहे. यापूर्वीही या रस्त्यावर दोन लहान मुलासह एका महिलेला खड्ड्यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त मिळत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून, स्थानीक नागरिकांकडून रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्यामुळे या रस्त्याचे काम रखडल्याचे स्पष्टीकरण पालिका प्रशासनाकडून दिले जात आहे. मात्र, हा तिढा सोडवणायत प्रशासनाला अपयश आल्याने नागरिकांचा नाहक बळी जात आहे.  

कल्याण-मलंग रोड हा शंभर फुटी रस्ता महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात आला असला तरी यातील द्वारली गावाजवळून जाणारा १ किमीचा रस्ता करण्यास गावकऱ्यांनी मोबदल्याची मागणी करत विरोध करून हा रस्ता रोखून धरला आहे. जोपर्यंत रस्ता रुंदीकरनाची नुकसान भरपाई मिळत नाही, तोपर्यत रस्त्याचे काम करू देणार नसल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे निर्माण झालेला हा तिढा सोडण्यासाठी पालिका प्रशासनाकडून सुरु असलेले प्रयत्न निष्फळ ठरले असून, पालिका प्रशासन हतबल झाले आहे. 

ग्रामस्थांच्या विरोधामुळे हा रस्ता पूर्ण करता येत नसल्याचे स्पष्टीकरन पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहे. मोबदल्याच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला हा तिढा सोडवण्यात पालिका प्रशासनाला अपयश आल्यने वादात हा रस्ता मात्र रखडला असून  या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे आता वाहन चालकाच्या जीवावर बेतले आहेत.