Wed, Jun 03, 2020 03:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तरुणाच्या पोटातून काढले दीड लिटर रक्त

तरुणाच्या पोटातून काढले दीड लिटर रक्त

Published On: Jan 17 2018 9:36AM | Last Updated: Jan 17 2018 9:36AM

बुकमार्क करा
ठाणे : प्रतिनिधी 

क्रिकेट खेळताना एका 20 वर्षीय तरुणाच्या पोटात चेंडूचा मार लागून तो जखमी झाला होता. या जखमेमुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊन त्याच्या पोटात रक्त जमा झाले होते. त्यामुळे तरुणाच्या जीवाला  धोका निर्माण झाला होता. अवघड परिस्थितीत यशस्वी शस्त्रक्रिया करून जिल्हा सामान्य रुग्णालयाने  त्याचे प्राण वाचवले आहेत. ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना शासकीय रुग्णालयाशिवाय दुसरा आधार नाही. त्यामुळे एखादी मोठी शस्त्रक्रिया करायची असेल तर रुग्णाला मुंबईतील रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागते. मात्र, 14 जानेवारीला जिल्ह्यातील गणेशपुरी, गोराड पाड्यातील सुनील तुंबडा या आदिवासी मुलावर तात्काळ शस्त्रक्रिया करून त्याचा जीव वाचविण्यात आला.

क्रिकेट खेळत असताना पोटातील स्वादुपिंडाला इजा होऊन अंतर्गत रक्तस्राव झाला. रुग्णाच्या जखमेचे गांभीर्य ओळखून सिव्हिल सर्जन डॉ. केम्पिपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शल्य चिकित्सक डॉ. निशिकांत रोकडे यांनी सुमारे 3 तास त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. त्याच्या पोटातील दीड ते दोन लीटर रक्त आणि स्वादुपिंडाचा काही भाग काढून त्याचा जीव वाचवण्यात आला. सध्या हा मुलगा धोक्याच्या बाहेर असून दक्षता विभागात उपचार घेत आहे.