Tue, Apr 23, 2019 01:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हत्येचा कट ही तर मोदींची जुनी रणनिती : संजय निरुपम 

हत्येचा कट ही तर मोदींची जुनी रणनिती : संजय निरुपम 

Published On: Jun 08 2018 1:55PM | Last Updated: Jun 08 2018 2:11PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

पुणे पोलिसांनी नक्षलवाद्यांनी राजीव गांधींच्या हत्येप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींची हत्या करण्याचा कट रचल्याचा मेल जाहीर केला.  या खळबळजनक आरोपानंतर काँग्रेसचे मुंबई काँग्रेस प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम यांनी ‘हीतर मोदींची रणनिती’ असल्याचा आरोप केला आहे. 

पुणे पोलिसांच्या म्हणण्यानुसर नक्षलवादी मोदींच्या हत्येच्या कट रचत होते. ही माहिती प्रसिध्द झाल्यावर याच्यावर काँग्रेसमधून संजय निरुपम यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणतात ‘नरेंद्र मोदींच्या हत्येच्या कटाची माहिती खोटी आहे असे मला म्हणायचे नाही पण, मोदी मुख्यमंत्री असल्यापसून ज्या ज्यावेळी मोदींची लोकप्रियता कमी होते त्या त्यावेळी त्यांची हत्या करण्याचा कट रचला जातो. त्यामुळे आताच्या दाव्यात किती सत्यता आहे हा प्रश्न आहे.’ 

 

I am not saying this is completely untrue but it has been PM Modi's old tactic, since he was CM, whenever his popularity declines, news of an assassination plot is planted. So it should be probed how much truth is in it this time: Sanjay Nirupam,Congress pic.twitter.com/lDVVvPDbwM

— ANI (@ANI) June 8, 2018

संजय निरुपम यांच्या या वक्तव्यामुळे आता या प्रकरणी राजकारण जोरदार तापण्याची शक्यता आहे. 

 

Tags : natendra modi assassination, naxalite planning PM assassination, congress leader  Sanjay Nirupam, Modi's old tactic