ठाणे : अमोल कदम
ठाण्यातील कोर्ट नाका परिसरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे तीन माजली इमारतीचा काही भाग कोसळला. याच दरम्यान रस्त्यावरुन जाणाऱ्या शाळकरी मुलाच्या अंगावर काही भाग पडल्याने तो जखमी झाला आहे. तसेच इमारतीच्या खाली पार्किंगधील तीन वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
इमारत या तीन मजली धोकादायक इमारतीमध्ये सात कुटुंब राहत होती. दुर्घटना झाली त्या इमारतीच्या बाजूला एनकेटी कॉलेज आहे. बारावी इयत्तेचे पेपर असल्याने त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त होता. त्यामुळे घटना स्थळी ठाणे नगरचे पोलिस शिपाई महेंद्र शेळके यांनी धाव घेत तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या जेष्ठ नागरिकाला सुरक्षित बाहेर काढले. घटनास्थळी ठाणे महालालिकेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी देखील दाखल झाले असून इमारतीचा मोडकळीस आलेला भाग मोकळा करण्यात येत आहे.