Wed, Nov 21, 2018 21:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'ओखी' मध्ये सापडलेले १ हजार मच्छीमार सिंधुदुर्ग किनार्‍यावर

'ओखी' मध्ये सापडलेले १ हजार मच्छीमार सिंधुदुर्ग किनार्‍यावर

Published On: Dec 03 2017 6:36AM | Last Updated: Dec 03 2017 6:36AM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

केरळ आणि तामीळनाडुच्या समुद्र किनार्‍यावर अहाकार माजवलेल्या ओखी वादळाचा मोठा फटका येथील मच्छीमारांना बसला आहे. या वादळामुळे अनेक मच्छीमार बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. ओखी वादळामुळे समुद्रात फसलेले एक हजार मच्छीमार महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग समुद्र किनार्‍यावर पोहचले आहेत. 

सिंधुदुर्ग समुद्र किनार्‍यावर केरळ आणि तामीळनाडुच्या एकूण ६८ नौका पोहचल्या आहेत. ज्यामध्ये ६६ नौका या केरळच्या तर दोन नौका तामीळनाडुच्या आहेत. यामध्ये ९५२ मच्छीमार आहेत. हे सर्व मच्छीमार सुरक्षित असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटव्‍दारे सांगितले आहे. समुद्र किनार्‍यावरील वादळाचा धोका कमी होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र सरकार मदत करणार असल्याचेही त्‍यांनी सांगितले आहे. किनार्‍यावरील धोका कमी झाल्यानंतर या मच्छीमारांना पुन्‍हा त्‍यांच्या परिसरात पाठविण्यात येणार आहे. 

मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्गचे जिल्‍हाधिकार्‍यांना समुद्रात फसलेल्या या मच्छीमारांची व्‍यवस्‍था करण्यास सांगितले आहे. यानंतर जिल्‍हाधिकार्‍यांनी स्‍थानीक अधिकार्‍यांमार्फत त्‍यांची सोय करण्यात आली असल्याचे सांगितले. समुद्रात फसलेल्या मच्छीमारांना महाराष्ट्र सरकारकडून मदत करण्यात आल्याने संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी फडणवीस यांचे आभार मानले आहेत.