Wed, Nov 14, 2018 17:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सी लिंक वाहतुकीस खुला; अफवांवर विश्वास ठेऊ नका

सी लिंक वाहतुकीस खुला; अफवांवर विश्वास ठेऊ नका

Published On: Dec 05 2017 11:45AM | Last Updated: Dec 05 2017 11:45AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

ओखी चक्रीवादळामुळे आज सकाळपासून मुंबई आणि परिसरात पावसाने हजेरी लावली असून, मध्य रेल्वेवरील वाहतूक मंदावली तर; पश्चिम रेल्वेवरील वाहतूकही ५ ते १० मिनिटे उशिराने सुरु आहे. हवामान खात्याने दिलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यामुळे आज मुंबई महानगरातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. या चक्रीवादळाचा मुंबईतील हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे विमानाची ये-जा ४० मिनिटे उशिराने होत आहे. वरळी सी लिंक वाहतुकीस खुला आहे. कोणत्याही प्रकारे वाहनांना धोका नाही. अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन पोलीसांनी केले आहे.

दक्षिण भारताला झोडपून टाकणारे ओखी चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने सरकत आहे. या ओखी चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र या भागांत येत्या चोवीस तासामध्ये आणखी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ओखी चक्रीवादळ सध्या ताशी १८ किलोमीटर वेगाने ईशान्यकडे सरकत आहे. मुंबईपासून ४२० किलोमीटर अंतरावर असलेले हे वादळ हळूहळू गुजरातकडे सरकत आहे.

ओखी चक्रीवादळाचा मुंबईतील हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. विमानाची ये-जा ४० मिनिटे उशिराने होत आहे. वरळी सी लिंक वाहतुकीस खुला आहे. कोणत्याही प्रकारे वाहनांना धोका नाही. अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन पोलीसांनी केले आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २९ मिनिटे उशिराने सुरू आहे. ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून समुद्रकिनारी न जाण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.