Thu, Jul 18, 2019 17:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हार्बर रेल्वे मार्गावर गोंधळ, बेलापूरला जाणारी लोकल पोहोचली किंग्ज सर्कलला

हार्बर रेल्वे मार्गावर गोंधळ, बेलापूरला जाणारी लोकल पोहोचली किंग्ज सर्कलला

Published On: May 22 2018 8:31AM | Last Updated: May 22 2018 8:31AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

मोटरमनच्या चुकीमुळे हार्बर रेल्‍वे मार्गावर सोमवारी हार्बर लोकल चुकीच्या मार्गावर भरकटली. यामुळे प्रशासनासह प्रवाशांमध्ये गोंधळाची परिस्‍थिती निर्माण झाली. या प्रकारामुळे हार्बर रेल्‍वे वाहतूक वीस मिनिटे विस्‍कळीत झाली. 

बेलापूर लोकलच्या मोटरमनकडून चुकून पश्चिम  रेल्वेच्या ट्रॅकवर गाडी घातल्यामुळे ही ट्रेन भरकटली. यानंतर किंग्ज सर्कल स्‍थानकावर ट्रेनमधील सर्व प्रवाशांना उतरवण्यात आले. वडाळा स्थानकात चुकीचा सिग्नल मिळाल्याने ही लोकल भरकटल्याचे मध्य रेल्वेकडून स्‍पष्ट करण्यात आले. मागील आठवडय़ात सीएसएमटीहून सुटलेली जलद लोकल सिग्नल मोडून भायखळा स्थानक पोहचली होती. याचा मोठा फटका प्रवाशांना मिळाल्याने प्रवाशांनी संताप व्‍यक्‍त केला.