Wed, Jul 24, 2019 05:44



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता गाडीवर 'पोलिस' लिहिता येणार नाही, लोगोवरही बंदी!

आता गाडीवर 'पोलिस' लिहिता येणार नाही, लोगोवरही बंदी!

Published On: Jun 26 2019 4:48PM | Last Updated: Jun 26 2019 4:50PM

संग्रहित छायाचित्र



मुंबई  : पुढारी ऑनलाईन 

मुंबई पोलिस आणि वाहतूक पोलिस यांना आपल्या खासगी गाडीवर 'पोलिस' अशी पाटी लावता येणार नाही, असा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला. अशी पाटी लावलेल्या गाडीवर यापुढे कारवाई केली जाणार आहे.

अनेक पोलिसांच्या खासगी गाडीवर 'पोलिस' अशी पाटी लावलेली असते. मात्र अनेकदा याचा वापर कारवाईपासून वाचण्यासाठी केला जातो. आता यापुढे गाडीवर मुंबई पोलीस किंवा वाहतूक पोलिसांचा लोगो लावता येणार नाही. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 2013 च्या कलम 134 प्रमाणे यावर कारवाई करण्यात येणार आहे.

हायकोर्टाच्या आदेशानंतर  वाहतूक पोलिसांना येत्या 7 दिवसात कुणावर कारवाई केली याचा अहवाल वाहतूक मुख्यालयाला सादर करायचा आहे. त्यामुळे येत्या काळात अशी कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस सक्रिय झाल्याचे दिसून येणार आहे. 

न्यायाधीशांसाठीही नियम

न्यायाधीशांनाही आपल्या खासगी वाहनांवर 'न्यायाधीश' असं लिहिता येणार नाही. याबाबत मुंबई हायकोर्टाने परिपत्रक काढले आहे. दरम्यान, अनेक पोलिसांच्या खासगी वाहनांवर नावाचा आणि पोलिसांच्या लोगोचा उल्लेख असतो. याचा वापर करून काही जणांकडून नियमांची पायमल्ली केली जाते. असे प्रकार रोखण्यासाठी हायकोर्टाने हा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे.