होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विद्यापीठांतील चर्चा दाबू नकाः रघुराम राजन

विद्यापीठांतील चर्चा दाबू नकाः रघुराम राजन

Published On: Mar 24 2018 11:58AM | Last Updated: Mar 24 2018 12:04PMमुंबई: पुढारी ऑनलाईन

देशातील विद्यापीठांमधील वातावरण खुले असायला हवे, विद्यापीठांमध्ये कोणत्याही विषयावर खुल्यापणाने चर्चा व्हायला हवी, विद्यापीठांत होणार्‍या चर्चा राष्ट्रविरोधी ठरवून त्या दाबल्या जाऊ नयेत, असे रिझर्व बँकेंचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले. विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या विचारधारांना प्रोत्साहन द्यायला हवे असेही ते म्हणाले. काल (शुक्रवार) मुंबईतील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी विद्यापीठ हे व्यासपीठ असले पाहिजे, जेथे विरोधी विचार हे राष्ट्रविरोधी आहेत असे सांगून दडपूण टाकले जाऊ नयेत, असे राजन म्हणाले. नवे आणि वेगळ विचार मांडणार्‍या लोकांचा एक वेगळा गट तयार करण्याचा विचार असून या गटाचा जागतिक विकासाच्या प्रक्रियेत समावेश होईल, असे ते म्हणाले.

रघुराम राजन हे रिझर्व बँकेंचे गव्हर्नर असताना त्यांनी घेतलेले काही निर्णय सरकारसाठी डोकेदुखी ठरले होते. रिझर्व बँकेत सरकारचा हस्तक्षेप होऊ नये या मताचे ते होते. अलिकडे त्यांना आप पक्षाकडून राज्यसभेच्या उमेदवारीची ऑफर देण्यात आली होती. मात्र, त्यांनी ती नाकारली होती.