Tue, Mar 26, 2019 23:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फितुरांविरोधात न्यायालयात जाणार

फितुरांविरोधात न्यायालयात जाणार

Published On: Dec 06 2017 1:44AM | Last Updated: Dec 06 2017 1:11AM

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी

अहमदनगर जिल्ह्यामधील खर्डा येथील नितीन आगे या मागासवर्गीय तरुणाच्या हत्येप्रकरणी 13 साक्षीदार फितूर झाल्याने या प्रकरणातील 9 आरोपी निर्दोष सुटले आहेत. याबाबत राज्य सरकार फितूर साक्षीदारांवर कारवाई होण्यासाठी अहमदनगर सत्र न्यायालयात दाद मागणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

नितीन यांचे वडील राजू आगे यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी फडणवीस यांनी त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले.

13 फितूर साक्षीदारांविरोधात कायदेशीर कारवाईसाठी राज्य सरकार सत्र न्यायालयात दाद मागणार असून, त्याबाबतचा प्रस्तावही विधी व न्याय विभागाकडून सादर करण्यात येत आहे. तसेच सत्र न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार असून, त्याबाबतची कार्यवाहीदेखील सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आगे यांना सांगितले. नितीन आगे हत्याप्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करीत दलित संघटनांनी आंदोलन छेडले आहे.