रोह्यात चक्रीवादळाने दैना; अनेक घरांचे छप्पर गायब

Last Updated: Jun 03 2020 2:19PM
Responsive image


मुंबई : पुढारी ऑनाईन 

निसर्ग चक्रीवादळाच्या वाऱ्याचा वेग अलिबागमध्ये ताशी ७० किमी (@10.45am) असल्याची नोंद अलिबाग भुचूंबकीय वेधशाळेच्या विंडस्पिड मीटरवर झाली असल्याची माहिती वेधशाळेच्या सूत्रांनी दिली.  पहाटे ५ वाजता १० किमी/तास असणारा वाऱ्याचा वेग साडे आठ वाजता १८ किमान/तास झाला, तर नऊ वाजल्यापासून सतत वाढत जावून आता ७० किमान/तास झाला आहे. वाऱ्याचा वेग पुढील तासात वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टी आणि मुंबईच्या दिशेने निसर्ग वादळ सरकत आहे. दुपारी १ पर्यंत हे अलीबागला धडकण्याची शक्यता आहे. ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या इशार्‍यानंतर संपूर्ण पश्‍चिम किनारपट्टीवर सतर्कता बाळगण्यात येत आहे. विशेषतः मुंबईला बुधवारी 3 जून रोजी या वादळाचा धोका संभवतो, असा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर खबरदारी घेण्यात येत आहे. तथापि मुंबईचा इतिहास पाहता येथे गेल्या 138 वर्षांमध्ये कोणतेही चक्रीवादळ किनारपट्टीला थडकलेले नाही. मात्र सध्याचे हवामान वेगळे असल्यामुळे ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा मुंबईवर परिणाम होऊ शकतो. 

Live :  *निसर्ग चक्रीवादळ अलीबाग अपडेट (सकाळी ११.१५ पर्यंत)*

अलिबागमध्ये वाऱ्याचा वेग ताशी ७० किमी

निसर्ग चक्रीवादळामुळे पावसाचा जोर वाढला

निसर्ग वादळाचा प्रवास होणार पनवेल मधून

अलिबाग गव्हर्नमेंट कॉलनीमधील नागरिकांचे अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात स्थलांतर

महाडमध्ये पहाटे साडे पाचपासून रिमझिम असणारा पावसाने पकडला जोर

खोपोली खालापुरातही प्रशासन सज्ज. शासकीय आणि सामजिक संघटनांची टीम प्रत्येक भागात मदतीसाठी सज्ज

रोहा तालुक्यातील सर्वात जुने असलेले धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कारखाने चक्रीवादळामुळे बंद

अलिबागमध्ये वाऱ्याचा वेग ताशी ७० किमी

अलिबाग पासून १३० किमी अंतरावर निसर्ग चक्रीवादळ

दुपारी १ पर्यंत निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता

जवळपास १३ हजार २४५ जणांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर 

अलिबाग बीचवर पोलिस यंत्रणा सज्ज 

जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांच्याकडून स्वतः पाहणी

निसर्ग चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क

रोह्यात जोरदार पावसाला सुरुवात

काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित 

खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णवाहिका सज्ज

जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कार यांच्याकडून स्वतः पाहणी

अलिबाग बीचवर पोलिस यंत्रणा सज्ज

निसर्ग चक्रीवादळ १३० किमी अंतरावर

निसर्ग चक्रीवादळाचा केंद्रबिंदू अलिबागच्या आसपास दुपारी धडकणार

तासाला 10 किमी वेगाने किनाऱ्याकडे येणाऱ्या निसर्गचा वेग 12 किमी झाला 

मुंबईसह पालघर, रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईत जवळपास 100 ते 120 किमी वेगाने वारा वाहण्याची शक्यता

तात्पूर्त्या कोविड सेंटरमधील रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे

मुंबईत महानगरपालिका चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सज्ज

कोकण आणि मुंबई किनारपट्टीवरील हजारो लोकांचे स्थलांतर 

मुंबईचे सर्व किनारपट्टीवर धोक्याचा इशारा देणारे लाल झेंडे

श्रीवर्धनमध्ये सोसाट्याचा वारा आणि पावसाला सुरुवात 

निसर्ग मुंबईपासून 190 किमीवर अंतरावर

मुंबईवरुन उड्डाण करणारी सर्व विमाने रद्द

समुद्राच्या पातळीत वाढ 

रत्नागिरीमध्ये रात्रीपासूनच सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस सुरु 

एनडीआरएफच्या टीम सतर्क, लोकांना दक्षतेचा इशारा

एनडीआरएफच्या 10 टीम तैनात 

निसर्ग चक्रीवादळ अलिबागपासून 140 किमी अंतरावर

दुपारी 3 ऐवजी 1 वाजता अलिबागला धडकण्याची शक्यता 

दुपारी 3 वाजता धडकणाऱ्या निसर्ग चक्रीवादळाचा वेग वाढला