Mon, Nov 19, 2018 00:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राष्ट्रवादीला रामराम ठोकत डावखरेंचा भाजपमध्ये प्रवेश

राष्ट्रवादीला रामराम ठोकत डावखरेंचा भाजपमध्ये प्रवेश

Published On: May 23 2018 6:22PM | Last Updated: May 23 2018 6:25PMमुंबईः पुढारी ऑनलाईन

पालघर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी आमदार पदाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. ही चर्चा खरी ठरली असून डावखरे उद्या (गुरूवार) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 

भाजपने याबाबतचे निवेदन देऊन माहिती दिली आहे. भाजपच्या निवेदनात सांगितले आहे की, कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधी विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे गुरूवारी दि.२४ मे रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी अकरा वाजता भाजप प्रदेश कार्यालयात निरंजन डावखरे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 

 

संबधित वृत्तः

डावखरेंची राष्ट्रवादीतून ६ वर्षांसाठी हकालपट्टी

निरंजन डावखरे यांचा आमदारपदाचा राजीनामा