Fri, Feb 22, 2019 15:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › टोमॅटो घसरला; घाऊक १२ रुपये किलो

टोमॅटो घसरला; घाऊक १२ रुपये किलो

Published On: Dec 16 2017 1:45AM | Last Updated: Dec 16 2017 1:12AM

बुकमार्क करा

नवी मुंबई : प्रतिनिधी

मुंबई कृषी उत्पन्न घाऊक बाजारात 15 दिवसांपूर्वी किलोला पन्नाशी गाठणार्‍या टोमॅटोला आता उतरती कळा लागली आहे. शुक्रवारी घाऊक बाजारात टोमॅटो साडेबारा रुपये किलो दराने विक्री झाला. 
29 नोव्हेंबरपासून 7 जानेवारीपर्यंत टोमॅटोचे दर 20 रुपये ते 44 रुपयांपर्यंत पोहोचले होते. विशेष म्हणजे उत्तम दर्जाचा टोमॅटो एक्सपोर्ट केला जातो आणि दुसर्‍या क्रमांकाचे टोमॅटोचे पीक बाजारात पाठवले जाते. घाऊक बाजारात टोमॅटोचे दर घसरले असले तरी किरकोळ बाजारात मात्र टोमॅटो आजही 35 ते 40 रुपये किलो दराने विक्री केला जातो.

मुंबई एपीएमसीत शुक्रवारी 658 गाड्यांची आवक झाली असून, त्यामध्ये 78 टेम्पो टोमॅटोचे होते. राज्यातून सांगली, बारामती, सातारा, नाशिक, पुणे, सोलापूर (निमगाव), लातूर या जिल्ह्यांतून टोमॅटोची आवक एपीएमसीत होते. तर परराज्यातील बंगळुरूमधून नवीन टोमॅटो सुरु झाला आहे. नाशिक जिल्ह्यातून हलक्या प्रतीचा माल येत असल्याने त्याला उठाव नसल्याचे व्यापारी सांगतात.