Sat, Apr 20, 2019 09:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कांदा साठ रुपयांवर; दर आणखी वाढणार

कांदा साठ रुपयांवर; दर आणखी वाढणार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नवी मुंबई : प्रतिनिधी

अंड्यांचे दर वाढल्यानंतर आता कांदाही महाग झाला असून किरकोळ बाजारात कांद्याने साठी गाठली असून एपीएमसी घाऊक बाजारात पन्नाशी पार केली आहे. येत्या आठवड्यात दरात आणखी वाढ होण्याची दाट शक्यता घाऊक व्यापारी अशोक वाळुंजे यांनी वर्तवली आहे. 

जून, जुलैमध्ये लागवड केलेल्या कांदा पिकाला चार वेळा अवकाळी पावसाने झोडपले. त्यामुळे कांदा सडला आहे. आजमितीस शेतकरी असेल तसा कांदा बाजारात घेऊन येत आहे. तो कांदा पूर्ण ओला असल्याने त्याची टिकाऊ क्षमता केवळ दोन दिवसांपुरतीच असल्याने तोही पिशवीत बंद असल्याने बाजारात येईपर्यंत सडू लागला आहे.

मुंबईला रोज 100 ट्रक कांदा लागतो. सध्या 80 ट्रक कांदा उपलब्ध होत आहे. एपीएमसी घाऊक  बाजारात गुरुवारी कांदा 45 ते 50 रुपये दराने विकला गेला. गेल्या आठवड्यात हा दर 20 रुपये होता.