Wed, Apr 24, 2019 19:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण परिमंडळातील कारखान्य‍ांची वीज बंद

कल्याण परिमंडळातील कारखान्य‍ांची वीज बंद

Published On: Jan 07 2018 6:03PM | Last Updated: Jan 07 2018 6:03PM

बुकमार्क करा
नवी मुंबई : प्रतिनिधी 

महापारेषणच्या वसई येथील 100/22 उपकेंद्रात बिघाड झाल्याने 35 मेगावॅट विजेची कमतरता जाणवू लागली आहे. त्‍यामुळे पर्यायाने कल्याण परिमंडळातील वसई, विरार व नालासोपारा या परिसरातील सुमारे 3 लाख ग्राहक प्रभावित झाले आहेत. तरी महावितरणने पर्यायी व्यवस्था वापरत घरगुती 3 लाख ग्राहकांचा खंडित वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त केला आहे पण, 800 औद्योगिक ग्राहकांचा पुरवठा बाधित आहे.

असे असले तरी महापरेषण केंद्रातील बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, रात्री 11 वाजेपर्यंत हा पुरवठा पूर्ववत होणे अपेक्षित आहे. 
मात्र सायंकाळच्या वेळी विजेची आणखीन मागणी वाढल्यास पुन्हा विजेची कमतरता भासू शकते. त्यामुळे या परिसरातील ग्राहकांना या काळात विजेचा जपून वापर करावा व महावितरण ला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.