Wed, Mar 27, 2019 06:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ११ महिन्यांत तब्बल ५२ लाचखोरांना शिक्षा 

११ महिन्यांत तब्बल ५२ लाचखोरांना शिक्षा 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नवी मुंबई: राजेंद्र पाटील 

राज्यात लाचलुचपत विभागाने 11 महिन्यांत टाकलेल्या धाडींत अडकलेल्या 1023 लाचखोरांपैकी 52 जणांना न्यायालयाकडून दोषी ठरविण्यात आले आहे. या लाचखोरांना सश्रम कारवास, साध्या कारावासासह 3 हजार ते 3 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास आणखी शिक्षा भोगावी लागणार आहे. या मध्ये मुंबई, भाईंदर आणि नवी मुंबईतील नऊ लाचखोरांचा समावेश आहे.

एसीबीने न्यायालयात सादर केलेल्या दोषरोपपत्रानुसार 775 लाचखोरीच्या प्रकरणात 52 लाचखोरांना शिक्षा झाली असून त्यामध्ये एसीबी सश्रम कारवास, साधी एक महिना कारवासाच्या शिक्षेसह 3 हजार ते 3 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात आला आहे. शिक्षा झालेल्या लाचखोरांमध्ये सातारा, सांगली, नाशिक, औरंगाबाद, मुंबई, नवी मुंबई, ठाणे ग्रामीण जिल्ह्यांतील लाचखोर आहेत. त्यामध्ये सुनील निकम (मिळकत व्यवस्थापक) मुंबई इमारत दुरुस्ती व पुर्नरचना म्हाडा, सविता मानकर ( दुकान निरीक्षक) मनपा मुंबई, संतोष नागवेकर, प्रदीप शिर्के ( कक्षसेवक) गोकुळदास तेजपाल रुग्णालय मुंबई, प्रकाश शिंदे (दुय्यम अभियंता) मनपा मुंबई, अशोक कळसकर (सहा. सुरक्षा अधिकारी) मुंबई मनपा, दिलीप जाधव ( वरिष्ठ चौकशी निरिक्षक) मुंबई मनपा, महेंद्र परदेशी (पीआय) नवी मुंबई, शिवशंकर मोरे (पीएसआय) भाईंदर, तुकाराम उशीर ( एएसआय) नाशिक, संजय कसबे (मंडळ अधिकारी) टेभुंर्णी माढा, आनंदा शिमदे (परिक्षण भूमापक) सांगली, बळीराम मोरे ( कृषी अधिकारी) पंचायत समिती सातारा, शोभा राऊत (भूसंपादन अधिकारी) उस्मानाबाद, पवन पाटील (कृषी अधिकारी) जळगाव, शालीना खांडेकर (सरपंच) भंडारा, जयंत माने (स्थापत्य अभियांत्रिकी सहायक) कोरेगाव, मनोहर कोठावदे ( दुकान निरीक्षक) नवी मुंबई, रुपराव शाहारे ( तत्कालीन लेखाधिकारी) औरंगाबाद, अरुण गायकवाड (अहमदनगर), प्रकाश हिंगमिरे (तत्कालीन पीआय) पुसद, लक्ष्मीकांत कोटूरकर (ओएस) वन विभाग यांच्यासह आणखी इतर लाचखोरांना शिक्षा झाली आहे.