Sat, Jul 20, 2019 08:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईचे कुलगुरुपद मुंबईकडेच की नागपूरकडे?

मुंबईचे कुलगुरुपद मुंबईकडेच की नागपूरकडे?

Published On: Apr 17 2018 2:27AM | Last Updated: Apr 17 2018 1:13AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुंसाठी अंतिम पाच नावे शनिवारी राजभवनावर पोहल्यावर आता मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी मुंबईतील रुईया महाविद्यालयाचे डॉ. सुहास पेडणेकर आणि नागपूर विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ. प्रमोद येवले या दोन नावात मोठी चर्चा सुरु झाली आहे. 

मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना पदावरून दूर केल्यानंतर नव्या कुलगुरूनिवडीसाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या शोधसमितीने सुमारे 30जणांच्या मुलाखतीनंतर अंतिम पाच नावे राजभवनकडे दिली असून, नागपूर, पुणे आणि मुंबई यामध्ये चुरस वाढली आहे. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे डॉ. रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर, नागपूर विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ. प्रमोद येवले आणि पुणे विद्यापीठातील संजीव सोनावणे यांच्यात चुरस होईल. नागपूरचा कुलगुरु होण्यासाठी मंत्रालयस्तरावरही प्रयत्न केले जात असले तरी मुंबई विद्यापीठाची माहिती असणारा कुलगुरु असावा असाही सूर असल्याने डॉ. पेडणेकर आणि डॉ. येवले यांच्यापैकी एक जण कुलगुरू होवू शकतो. अंतिम पाच नावे जाहीर करण्यासाठी मात्र राजभवनमधून कमालीची गुप्‍तता पाळली जात आहे. यासंदर्भात पेडणेकर आणि डॉ. येवले यांच्याशी संपर्क साधल्यानंर अद्याप कोणत्याही सूचना राजभवनकडून आल्या नसल्याचे सांगितले.

Tags : Mumbai, new Mumbai university, Vice Chancellor, will be from Mumbai, Nagpur, Mumbai news