होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भ्रष्टाचार निर्मूलन, मानवाधिकार शब्द वापरण्यास मनाई

भ्रष्टाचार निर्मूलन, मानवाधिकार शब्द वापरण्यास मनाई

Published On: Jul 06 2018 8:36AM | Last Updated: Jul 06 2018 8:36AMमुंबई : प्रतिनिधी

धर्मादाय आयुक्तांकडे शैक्षणिक, सामाजिक वा धार्मिक उद्देशासाठी नोंदणी झालेल्या कुठल्याही खासगी संस्थांना यापुढे त्यांच्या नावात भ्रष्टाचारनिर्मूलन किंवा मानवाधिकार या शब्दांचा वापर करता येणार नाही. तसे निर्देश राज्य शासनाने जारी केले आहेत.

सध्या सर्व संस्थांना त्यांच्या नावातून भ्रष्टाचारनिर्मूलन व मानवाधिकार हे शब्द वगळून नव्या नावाने नोंदणीत दुरुस्ती करण्यास सांगण्यात आले आहे. ज्या संस्था हे शब्द वगळून संस्थेच्या नावात सुधारणा करणार नाहीत, अशा सर्व संस्थांवर बरखास्तीची कारवाई करण्याचा इशारा धर्मादाय आयुक्तांनी दिला आहे. ‘भ्रष्टाचारनिर्मूलन’ हे केंद्र व राज्य सरकारांचे काम आहे. भ्रष्टाचार निर्मूलन हा कोणत्याही सामाजिक संस्थेचा उद्देश असू शकत नाही. त्यामुळे कोणतीही खासगी संस्था भ्रष्टाचार निर्मूलनाचे नाव धारण करु शकत नाही, असा निवाडा उच्च न्यायालयाने दिला आहे.