Thu, Apr 18, 2019 16:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फांदीची नाही वटवृक्षाची पूजा करायला हवी : दा. कृ. सोमण

फांदीची नाही वटवृक्षाची पूजा करायला हवी : दा. कृ. सोमण

Published On: Jun 27 2018 9:48AM | Last Updated: Jun 27 2018 9:48AMठाणे : अमोल कदम

ज्येष्ठात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा या पौर्णिमेला धार्मिक महत्त्व आहेच, पण त्यामागचे वैज्ञानिक महत्त्वही समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पिढ्यांनपिढ्या वटपौर्णिमा साजरी होत आहे. या वटपौर्णिमेला वटवृक्षांची पूजा करायला हवी, वडाच्या फांदीची नको. ज्याला पूजायचे त्याला तोडून कसे चालेल, असे मत पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी पुढारीशी बोलताना व्यक्त केले.

यावर्षी अधिक ज्येष्ठ महिना आल्यामुळे वटपौर्णिमेपासूनचे सर्व सण सुमारे वीस दिवस उशीरा येत आहेत. ज्यादिवशी सूर्यास्तापूर्वी सहा घटिका म्हणजे, दोन तास चोवीस मिनिटे ज्येष्ठ पौर्णिमा असेल तो दिवस वटपौर्णिमा साजरी करण्याचा मानला जातो. यावर्षी बुधवार, 27 जून रोजी सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी ज्येष्ठ पौर्णिमा सुरू होते. त्यामुळे बुधवारी वटपौर्णि ा आहे. पर्यावरणाचे महत्त्व प्राचीनकाळीही होते. गावात वटवृक्ष असावेत, आयुर्वेदामध्ये वटवृक्षाचे महत्त्व सांगितलेले आहे.

वटवृक्षाचे आयुष्यही मोठे असते. त्याची छाया चांगली सुखावह होते. पावसाळ्यापूर्वी येणार्‍या या दिवसात वडाचे रोपटे लावावे त्याचे संवर्धन करावे किंवा पाटावर चंदनाने वटवृक्षाचे चित्र काढून त्याची पूजा करावी. पूजा आपल्यात चांगला बदल व्हावा यासाठी करावयाची असते. वटपौर्णिा पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी करावयाची असते. यादिवशी उपवास करण्याची पद्धत आहे. उपवास शरीरात मांद्य येऊ नये, शरीर हलके रहावे यासाठी करावयाचे असतात. प्राचीन काळापासून धर्मशास्त्रात या गोष्टी सांगितलेल्या आहेत. सण-उत्सव हे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी असतात. म्हणून ते साजरे करताना प्रदूषण होणार नाही, निसर्गाला धोका पोहोचणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी, असेही ते म्हणाले.

वटपौर्णिमा पूजेचे साहित्य
वटपौर्णिेला महिला हळद, कुंकू, गुलाल, रांगोळी, तांब्या, ताम्हन, पळी, भांडे, पाट, गंध, अक्षता, बुक्का, फुले, तुळशी, दूर्वा, उदबत्ती, कापूर, निरंजन, विड्याची पाने, कापसाची वस्त्रे, सुत, जानवे, सुपार्‍या, फळे, नारळ, गूळ, खोबरे, बांगडया, फणी, गळेसरी, पंचामृत, खारका, बदाम आदी.