होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भेटी लागी जीवा लागलीसे आस; आता शरद पवार राज्यपालांच्या भेटीला!

भेटी लागी जीवा लागलीसे आस; आता शरद पवार राज्यपालांच्या भेटीला!

Last Updated: May 25 2020 1:07PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

राज्यात राजभवनार राज्यपाल भेटीचा विषय राज्यात कोरोना पेक्षाही अधिक गांभिर्याने चर्चिला जात आहे. त्याचा पायंडा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. त्यामुळे शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांना भेटायला लाज वाटते का? अशीही सामनातून विचारणा करण्यात आली. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांची भेट घेतल्याने भाजपनेही टोला देण्याची संधी सोडली नाही. 

अधिक वाचा : उद्धव ठाकरेंकडून रेल्वेची मागणी, लगेच रेल्वेमंत्र्यांकडून आव्हान, नंतर संजय राऊतांचा खोचक टोमणा!

आता याच पार्श्वभूमीवर दस्तुरखुद्द राष्ट्रवादी शरद पवार राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या भेटीला पोहोचले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निमंत्रण दिल्याने शरद पवार राजभवनात दाखल झाले आहेत. राज्यपालांविरोधातील महाविकास आघाडी सरकारची नाराजी लपून राहिलेली नाही. भाजप नेते सातत्याने राजभवनावर ठिय्या मांडत असल्याने सरकारकडून नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे राज्यपाल आणि शरद पवार यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. 

अधिक वाचा : सीएम योगींच्या 'या' अजब फतव्याने राज्यातील उद्योगांची अडचण होणार?

या भेटीवेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेलही सोबत होते. त्यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगत अधिक भाष्य करण्याचे टाळले. दरम्यान, शरद पवार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाली. पटेल यांनी यावेळी रेल्वे चांगलं काम करत असल्याचे सांगत कालच्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

अधिक वाचा : सीएम योगींच्या 'त्या' निर्णयानंतर राज ठाकरेंकडूनही रोखठोक पलटवार!

काल (ता.२५) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील भाजप नेत्यांवर तसेच केंद्र सरकारवर कडाडून हल्ला चढवला होता. राज्यात अडकलेल्या मजुरांसाठी महाराष्ट्राने दररोज 80 रेल्वे सोडण्याची मागणी केली आहे. मात्र प्रत्यक्षात रेल्वेकडून फक्त 40 रेल्वे  सोडण्यात येत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी साधलेल्या संवादात सांगितले. 

अधिक वाचा : राज्यात कोरोनाग्रस्तांची ५० हजारी पार; एकट्या मुंबईत तब्बल ३० हजार

त्यानंतर संध्याकाळी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरे यांच्या आरोपाला उत्तर देत सोमवारपासून दररोज 125 श्रमिक ट्रेन देण्याची रेल्वे मंत्रालयाची तयारी आहे, असे सांगितले. मात्र, त्यासाठी राज्यातील स्थलांतरीत मजुरांची यादी राज्य शासनाने दीड तासात मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे द्यावे असे ट्विट केले. परंतु रात्री उशिरापर्यत राज्य सरकारकडून मजुरांची कोणतीही यादी आली नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले.

अधिक वाचा : गडद संकटाची चाहुल; राज्य सरकारने थेट केरळमधून डॉक्टर, परिचारिका मागवल्या!

पीयुष गोयल यांनी आपल्या ट्विटमध्ये उद्धवजी आशा आहे तुम्ही स्वस्थ असाल. तुमच्या स्वास्थ्यासाठी शुभेच्छा. महाराष्ट्राला उद्यापासून रोज 125 श्रमिक स्पेशल ट्रेन देण्याची रेल्वेची तयारी आहे. तुमच्या मजुरांची यादी तयार आहे, असे तुम्ही सांगितले. तुम्ही ही यादी कृपया रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे एका तासाच्या आत सादर करावी. यासोबतच ट्रेन कुठून सोडायची आहे, प्रवाशांनुसार ट्रेनची संख्या, त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र ही सर्व माहितीही द्यावी. यानुसार ट्रेन सोडण्याचे नियोजन आम्हाला करता येईल, असेही गोयल यांनी सांगितले.