Tue, Sep 17, 2019 22:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शरद पवारांना माझी घुसमट सांगण्याचा प्रयत्न केला, पण...

पवारांना माझी घुसमट सांगण्याचा प्रयत्न केला, पण...

Published On: May 22 2019 3:03PM | Last Updated: May 22 2019 6:23PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

राष्ट्रवादीवर गेल्या काही दिवसापासून नाराज असलेले बीड जिल्ह्यातील वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या या भूमिकेमुळे लोकसभेच्या निकालापूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना चांगलाच धक्का बसला. या घडामोडीनंतर जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रावादीला राम राम ठोकण्याचे कारण स्पष्ट केले. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्यामागे अनेक कारणे असल्याचे जयदत्त यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून पक्षात कोंडी, घुसमट, अवमूल्यन होणे हे सातत्याने घडत गेले. यात काही सुधारणा होईल असे वाटत होते पण कटाक्षाने याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी शरद पवार यांच्याकडे धाव घेतली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मला कोणालाही दोषी ठरवायचे नाही असे म्हणत अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली.

वाचा►पंकजा मुंडेंच्या 'या' खेळीने विनायक मेटेंचा पत्ता परस्पर कट

तसेच ते पुढे म्हणाले, २०१४ च्या मोदी लाटेत बीडमध्ये मी एकटा निवडून आलो. त्यामुळे कुणी आले गेले कुणाला महत्व द्यायचे हा नेतृत्वाचा प्रश्न असतो. “कुणा व्यक्तीच्या येण्या किंवा जाण्याने माझ्यावर काही फरक पडणार नव्हता. असा खोचक टोलादेखील राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना लगावला. 

जातविरहित राजकारण हा शिवसेना गाभा आहे. कामाला-गुणाला प्राधान्य, दिलेला शब्द पाळणे हे मी पाहिले आहे. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे क्षीरसागर म्हणाले. तसेच, मी कुठल्या अटींवर प्रवेश केलेला नाही. कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

 

  

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex