Wed, Feb 20, 2019 10:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक भाजपात

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक भाजपात

Published On: Jan 30 2018 4:34PM | Last Updated: Jan 30 2018 4:15PMमुंबई  : प्रतिनिधी 

भाजपात पुन्हा इनकमिंग सुरू झाले असून मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ट नेते माजी नगरसेवक हारून खान यांनी भाजपात प्रवेश केला. खान यांच्या पत्नी विद्यमान नगरसेविका असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का आहे.
मनसेच्या सहा नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशानंतर आता भाजपातही इनकमिंग सुरू झाले आहे. पवई व विक्रोळीत राष्ट्रवादी काँग्रेसची पाळमुळे रोवणार्‍या हारून खान यांनी आपला मुलगा याच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपा खासदार किरीट सोम्मया व मुंबई महापालिका भाजपा गटनेते मनोज कोटक उपस्थित होते. खान यांच्या पत्नी ज्योती खान या फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणूकीत प्रभाग क्रमांक १२४ मधून  विजयी झाल्या आहेत.  त्यामुळे हारून खान यांचा प्रवेश भाजपासाठी फायदेशीर तर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का आहे.