Mon, May 20, 2019 23:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संघटनात्मक पाठबळाशिवाय हे शक्य नाही : मुक्ता दाभोलकर

संघटनात्मक पाठबळाशिवाय हे शक्य नाही : मुक्ता दाभोलकर

Published On: Aug 22 2018 10:25PM | Last Updated: Aug 22 2018 10:25PMठाणे : प्रतिनिधी

डॉ. दाभोलकर,कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश या चार खुनांच्या मागे साधर्म्यच नाही तर त्यामागची लिंकही सारखीच आहे. या हत्यामागचे सूत्रधार पकडणे , हे आमच्या दृष्टीने महत्वाचे आहे. याचा पुर्नरच्चार अंधश्रद्धा निर्मूलन सामितीच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांनी बुधवारी ठाण्यात केला. 

कोकण मराठी साहित्य  परिषद युवा शक्ती आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ठाणे केंद्र यांच्या संयुक्त  विद्यमाने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस  समारंभ दाभोलकर यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. एम. एच. हायस्कूलमध्ये हा कार्यक्रम  बुधवारी झाला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या,डॉ. दाभोलकर यांच्या खुनानंतर अडीच वर्षांनी पहिली अटक झाली, तेव्हापासूनच या हत्येमागच्या सुत्रधाराला ताब्यात घ्या, अशी आमची मागणी आहे. तसे झाले असते तर पुढच्या तीन हत्या झाल्या नसत्या याचा त्यांनी पुर्नरच्चार केला. त्या म्हणाल्या, या हत्याप्रकरणी आतापर्यंत सापडलेल्या सर्व धाग्यादोर्‍याची सांगड घालणे गरजेचे आहे. या सगळ्या तपास यंत्रणेवर उच्व न्यायालयाचे नियंत्रण आहे, निगराणी आहे. या खुनांमागे संघटनांत्मक पाठबळ असल्याशिवाय एवढया मोठ्या प्रमाणात अशा घटना घडणार नाहीत, यावर उच्च न्यायालयात चर्चा झाली. मारेकरी इतका काळ बाहेर कसे राहतात, त्यांची लपण्याची जागा, त्यांचा खर्च, यासगळ्या  गोष्टी पाठबळाशिवाय शक्य नाही, यासाठी या खुनांमागील सुत्रधारांचा शोध घ्या, अशी आमची मागणी आहे. एवढी माणसं  मारली जातात. त्यामागचा कट उलगडणं महत्वाचं आहे. न्यायालयाच्या नियंत्रणामुळेच तपास यंत्रणा इथं पर्यंत  पोहचल्या