Wed, Jun 03, 2020 18:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नारायण राणे आत्मचरीत्र लिहिणार

'अब आएगा मजा, सबका हिसाब होगा' : कोणावर 'वाग्बाण' सुटणार?

Published On: Apr 24 2019 5:36PM | Last Updated: Apr 24 2019 5:30PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे आपले आत्मचरीत्र लिहिणार आहेत.  त्‍यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. नारायण राणे आपले आत्‍मचरीत्र लिहिणार असल्‍याची माहिती देताना नितेश राणे यांनी आपल्‍या ट्विटच्या शेवटी 'अब आएगा मजा, सबका हिसाब होगा'' असे म्‍हटले आहे. त्यामळे कोणावर 'वाग्बाण' सुटणार? याची चर्चा रंगली आहे. 

“माझे मार्गदर्शक आणि वडील नारायण राणे स्वत:च्या शब्दात लवकरच आत्मचरीत्र लिहिणार आहेत. अब आएगा मजा, सबका हिसाब होगा”, असे ट्विट नितेश राणे यांनी केले. अब आएगा मजा, सबका हिसाब होगा’’ या नितेश राणे यांच्या शब्‍दांमुळे आता नारायण राणे आपल्‍या आत्मचरित्रात काय गौप्यस्फोट करणार, याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे.  

नारायण राणे यांनी शिवसेनेतून आपल्‍या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. युतीचे सरकार असताना १ फेब्रुवारी ते १७ ऑक्टोबर १९९९ या कालखंडात त्‍यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भुषविले. २००५ पर्यंत ते शिवसेनेचे सदस्य होते. शिवसेनेत मतभेद झाल्‍यानेतर त्‍यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्‍यानंतर काँग्रेसला राम राम करत  १ ऑक्टोबर २०१७ रोजी 'महाराष्ट्र स्वाभिमान' या पक्षाची स्थापना केली. 

नारायण राणे हे महाराष्‍ट्रातील एक वजनदार नेते असून त्‍यांचा स्‍वभाव आक्रमक आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्‍यापासून ते कायम सेनेवर आपला  निशाणा साधत असतात. त्‍यामुळे आता ते आपल्‍या आत्‍मचरित्रात शिवसेनेबाबत काय लिहिणार आणि कोणत्‍या नेत्‍यांविषयी काय गौप्यस्‍फोट करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.