Sat, Jul 20, 2019 23:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नारायण राणेंना वेटिंग सिग्नलच

नारायण राणेंना वेटिंग सिग्नलच

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी
विधान परिषदेची संधी हुकल्याने नारायण राणे यांना आमदार आणि मंत्री होण्यासाठी आणखी वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. आता जुलै महिन्यात विधान परिषदेच्या दहा जागा रिक्त होत असून त्यावेळी राणेंची वर्णी लावली जाऊ शकते. राणेंनी मात्र त्यापूर्वीही चमत्कार होऊ शकतो अशी प्रतिक्रिया दिली. राणेंचा विधान परिषदेतील प्रवेश लांबल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तारही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

नारायण राणे यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करून एनडीएमध्ये प्रवेश केला. मात्र, एकाचवेळी शिवसेना आणि काँग्रेसशी वैर असल्याने त्यांचा विधान परिषदेतील प्रवेश मात्र हुकला. राणेंना उमेदवारी दिली तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येईल. प्रसंगी सरकारही धोक्यात येण्याची शक्यता पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध निर्णय घेतला. राणेंऐवजी प्रसाद लाड यांना त्यांनी पसंती दिली. जुलै २०१८ मध्ये विधानसभा सदस्यांमधून विधानसभेवर निवडून  द्यायच्या दहा जागा रिक्त होत आहेत. 

भाजपचे संख्याबळ पाहता पाच जागा सहज निवडून येऊ शकतात. त्यावेळी राणेंना विधान परिषदेवर पाठविले जाऊ शकते. राणेंना काँग्रेस सोडताना भाजपने मंत्री बनविण्याचे आश्‍वासन दिले आहे. नागपूर येथे ११ डिसेंबर रोजी होणार्‍या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी चर्चा आहे. मात्र, मुख्यमंत्री आणखी काही काळ विस्तार  लांबणीवर टाकतील, असे बोलले जात आहे.