Fri, Nov 24, 2017 20:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राणेंच्या रिक्त जागेची पोट निवडणूक ७ डिसेंबरला

राणेंच्या रिक्त जागेची पोट निवडणूक ७ डिसेंबरला

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

काँग्रेसला रामराम ठोकत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करणाऱ्या नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी ७ डिसेंबरला पोट निवडणूक घेण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून याबाबत माहीती देण्यात आली.

काँग्रेस सोडून नव्या पक्षाची स्थापना करण्यापूर्वी राणे यांनी काँग्रेसकडून मिळालेल्या विधान परिषद सदस्यत्वाचा २२ सप्टेंबरला राजीनामा दिला होता. विधान परिषद सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या या एका जागेसाठी ७ डिसेंबरला निवडणूक घेण्यात येणार आहे. २० नोव्हेंबरला निवडणुकीची अधिसूचना निघून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार असून २७ तारखेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.

>> 'नारायण राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश होणारच'

>> नारायण राणे यांचा काँग्रेसचा राजीनामा