Mon, Mar 25, 2019 17:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नाणार प्रकल्पाच्या समर्थनातील पत्रकार परिषद उधळली

नाणार प्रकल्पाच्या समर्थनातील पत्रकार परिषद उधळली

Published On: Apr 25 2018 3:49PM | Last Updated: Apr 25 2018 3:49PMमुंबई : प्रतिनिधी

कोकणात येवू घातलेल्या नाणार प्रकल्पाला शिवसेना, मनसे आणि स्वाभिमान संघटनेचा विरोध केला आहे. असे असताना, बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघात नाणार प्रकल्पाच्या समर्थनात नाणार प्रकल्प बचाव समितीचे अध्यक्ष अजयसिंह सेंगर यांची पत्रकार परिषद ठेवण्यात आली होती. ही पत्रकार परिषद किशोर बाने,  आणि स्वाभिमान संघटनेच्या कार्यकार्त्यांनी उधळून लावली. यावेळी पत्रकार संघातमध्ये मोठ्या प्रमाणात गदारोळ उडाला होता.

नाणार प्रकल्पाच्या समर्थनात सुरु असलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्वाभिमानी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार टेबल वाजवून नारायण राणे जिंदाबादच्या घोषणा दिल्या. तर ग्रामस्थ किशोर बने यांनी सेंगर यांच्याविरोधात घोषणा दिल्या. यामुळे वातावरण तंग झाले. चिघळलेले वातावरण पाहून पोलिसांनी या सर्वाना बाहेर काढले.  

सेंगर यांचा नाणार प्रकल्पाशी काहीच सबंध नाही. ते पनवेल मध्ये वास्तव्याला आहेत. असे असताना, त्यांना नाणार प्रकल्पाचा एवढा पुळका का? असा प्रश्न उपस्थित पत्रकारांनी विचारल्यावर त्यांनी शिवसेना, मनसे आणि स्वाभिमान संघटनेवर हल्ला केला. ‘नाणार प्रकल्पामुळे येथील गावतील १ लाख मुलांना रोजगार मिळणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्प आणला आहे. त्यावर राजकारण करून तो गुजरातला येण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. तो आम्ही होवू देणार नाही.’ असा इशारा त्यांनी यावेळी दिला. 

अजय सेंगर हे करणी सेनेचे अध्यक्ष आहेत. पद्मावत चित्रपटाविरोधात अशाचप्रकारे आंदोलन करून ते प्रकाशझोतात आले होते. यामुळे राज्यात नाणार प्रकल्पामुळे राजकीय वातावरण तापले आहे. असे असताना सेंगर सारखे लोक येऊन नाणार प्रकल्प  पाठिंबा देत असतील तर आम्ही तो सहन करणार नाही. अशी प्रतिक्रिया नाणार प्रकल्पग्रस्त आंदोलनाचे अध्यक्ष अशोक वालम यांनी दिली.