Fri, Apr 26, 2019 09:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नाना ; एक खरा खुरा ‘नटसम्राट’ 

नाना ; एक खरा खुरा ‘नटसम्राट’ 

Published On: Jan 01 2018 9:00AM | Last Updated: Jan 01 2018 9:00AM

बुकमार्क करा
मुंबईः पुढारी ऑनलाईन 

yes नाना पाटेकर हे ज्येष्ठ अभिनेते असून त्यांनी अनेक हिंदी-मराठी चित्रपटांत व नाटकांत नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्रनायक अशा विविध भूमिका केल्या आहेत. 

yes नाना उर्फ विश्वनाथ पाटेकर यांचा जन्म १ जानेवारी १९५१ मध्ये मुंबईतील एका मराठी कुटुंबात झाला. त्यांचे वडील दिनकर पाटेकर हे चित्रकार होते. 

yes नानांचे शिक्षण जे.जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून झाले. याचवेळी ते कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात सहभाग घेत होते. नानांना चित्रकलेची आवडही आहे. 

yes जगाची व जगण्याची जाण असलेले हे एक उत्तम नटच नव्हे तर चित्रपटसृष्टीचे नटसम्राट आहेत. त्यांनी ‘गमन’ चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण केले. पुढे आठ वर्षे नाना चित्रपटात मिळेल ती भूमिका करत राहिले. 

yes नानांची पहिली यशस्वी भूमिका एन. चंद्रा यांचा ‘अंकुश’ हा चित्रपट. 1986 मध्ये आलेल्या या चित्रपटात नानांनी एका सरळमार्गी पण बेकारीमुळे त्रस्त असलेल्या युवकाची भूमिका केली होती.ती अविस्मरणीय ठरली. 

yes पुढे ‘परिंदा’ चित्रपटात नानांची खलनायकाची भूमिका अफाट गाजली. 1992 मध्ये ‘तिरंगा’ या चित्रपटाद्वारे नाना पाटेकरांना प्रमुख भूमिका करावयाचा पहिल्यांदा मान मिळाला. 

yes आपल्या संवादफेकीमुळे नाना पाटेकर यांनी संवाद शैलीकरिता प्रसिद्ध असलेल्या त्या चित्रपटातील राजकुमार यांच्या तोडीस तोड अभिनय केला. 

yes नानांनी सप्टेंबर २०१५ मध्ये अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याबरोबर ‘नाम फाऊंडेशन’ या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना विशेष करून मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना मदत करताहेत.

 

yes अभिनयाच्या ‘नटसम्राटा’चे वैभव (पुरस्कार) 

फिल्मफेअर पुरस्कार -    सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता परिंदा

फिल्मफेअर पुरस्कार -    सर्वोत्कृष्ट खलनायक    अंगार

फिल्मफेअर पुरस्कार -    सर्वोत्कृष्ट अभिनेता    क्रांतिवीर

राष्ट्रीय पुरस्कार   -       सर्वोत्कृष्ट अभिनेता    क्रांतिवीर

स्टार स्क्रीन पुरस्कार -    सर्वोत्कृष्ट अभिनेता    क्रांतिवीर

फिल्मफेअर पुरस्कार -    सर्वोत्कृष्ट खलनायक    अपहरण

स्टार स्क्रीन पुरस्कार -    सर्वोत्कृष्ट खलनायक    अपहरण