Sun, Nov 18, 2018 01:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › साताऱ्याच्या गोंधळेकरकडून मोठा शस्त्रसाठा जप्त 

साताऱ्याच्या गोंधळेकरकडून मोठा शस्त्रसाठा जप्त 

Published On: Aug 11 2018 9:18PM | Last Updated: Aug 11 2018 10:17PMमुंबई : प्रतिनिधी

नालासोपारा प्रकरणातील तिसरा आरोपी सुधन्वा गोंधळेकर याने पुण्यात लपवलेला मोठा शस्त्रसाठा हाती आल्याची माहिती एटीएसने शनिवारी दिली.

गावठी पिस्टल मॅग्झिनसह एक, गावठी कट्टा एक, एअरगन एक, पिस्टल बॅरल 10, अर्धवट तयार पिस्टल बॉडी सहा, पिस्टल मॅग्झिन सहा, अर्धवट तयार मॅग्झिन तीन, अर्धवट तयार पिस्टल स्लाईड सात, रिले स्वीच 16, वाहनांच्या नंबर प्लेट्स सहा, ट्रिगर मेकॅनिझम एक, स्टील चाकू एक असा हा साठा आहे.

एटीएसने प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार सुधन्वाकडे इतरही अर्धवट तयार केलेले शस्त्रांचे सुटे भाग, टॉर्च, बॅटरी, हँडग्लोव्हज, इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्फोटकांविषयीचे हँडबुक, एक्स्प्लोसिव्ह व मोबाईल प्रिंटआऊट, रिले स्वीच सर्किट ड्रॉईंग, पेन ड्राईव्ह, हार्ड डिक्स, मेमरी कार्डदेखील जप्‍त करण्यात आली आहेत.