होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आंदोलनामुळे शाळेत अडकलेल्या मुलांना पोलिसांनी सोडले घरी

आंदोलनामुळे शाळेत अडकलेल्या मुलांना पोलिसांनी सोडले घरी

Published On: Jan 03 2018 7:13PM | Last Updated: Jan 03 2018 7:13PM

बुकमार्क करा
नालासोपारा : रुतिका वेंगुर्लेकर

वसई पूर्वेकडील वालीव फादरवाडी येथील विद्या विकासनी शाळेत आज बुधवार सकाळी मुले नेहमीप्रमाणे आली होती मात्र  बाहेर आंदोलन सुरु झाल्‍याने शाळेला सुट्टी देण्यात आली. यावेळी वालीव पोलिसांनी स्‍कुल बसेसना पोलीस संरक्षण देत सर्व मुलांना घरी सोडले. 

एरव्ही पोलिसांच्या बाबतीत अनेक लोक नाक मुरडतात मात्र आज आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वालीव पोलिसांनी शाळेत अडकलेल्या मुलांना सुखरूप घरी सोडले .वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत फादर वाडी येथील विद्या विकासनी ही शाहा आहे. सर्व मुले नेहमीप्रमाणे आज सकाळी शाळेला आली होती. बाहेर आंदोलन सुरु असल्याने सगळीकडे गाड्या ,रिक्षा ,बसेस बंद करण्यात आल्‍या होत्‍या. यामुळे शिक्षक व पालकांना चिंता लागून राहीली होती. यावेळी  वालीव पोलीस निरीक्षक संजय हजारे यांना फोन करून ही गोष्‍ट सांगितल्‍यावर  पोलीसांकडून स्‍कुलबसना संरक्षण पुरवण्यात आले. यावेळी पोलिसांनी २१ स्‍कुल बसेसना पोलिस संरक्षण देत मुलांना सुखरूप घरी पोहचवले.