Wed, Feb 20, 2019 16:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुक्‍ता दाभोळकर, आव्‍हाड निशाण्यावर; एटीएसचा धक्‍कादायक खुलासा

मुक्‍ता दाभोळकर, आव्‍हाड निशाण्यावर; एटीएसचा धक्‍कादायक खुलासा

Published On: Aug 31 2018 2:24PM | Last Updated: Aug 31 2018 4:19PMमुंबई : अवधूत खराडे

नालासोपारा प्रकरणी अटक केलेल्यांचा डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाशी संबंध तपासताना धक्‍कादायक बाब राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या हाती लागली आहे. नालासोपारा प्रकरणी अटक केलेल्या आरोपींचे पुढील लक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या मुक्‍ता दाभोलकर, राष्‍ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्‍हाड, शाम मानव यांच्यासह काहीजण असल्याचे एटीएसने सांगितले. तसेच याप्रकरणातील आरोपी व माझगाव डॉकमधील कर्मचारी अविनाश पवार याला शुक्रवारी सत्र न्यायालयात हजर केले. 

एटीएसने यावेळी आतापर्यंत अविनाशकड़े केलेल्या तपासाची डायरी न्यायालयासमोर उलगडली, यात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. एटीएसने न्यायालयाकडे अविनाशच्या १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे.

कोर्टाने एटीएसला फटकारले

गौरी लंकेश हत्येप्रकरणी अटक असलेल्या अमोल काळेचा उल्लेख पहिल्या रिमांड पासून एटीएसने केला आहे. मग अमोल काळेचा ताबा घेण्यासाठी एटीएसने आत्तापर्यंत काय केले, असा सवाल करत न्यायालयाने एटीएसला फटकारले आहे. तसेच अविनाशच्या तपासाबाबत योग्य उत्तर देण्यास एटीएसला २ तासांचा वेळ दिला.