Fri, Apr 26, 2019 17:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नालासोपारा स्‍फोटकप्रकरण : श्रीकांत पांगरकर जालन्यातून अटक

नालासोपारा स्‍फोटकप्रकरण : श्रीकांत पांगरकर जालन्यातून अटक

Published On: Aug 19 2018 11:26PM | Last Updated: Aug 19 2018 11:26PMमुंबई : प्रतिनिधी

जालना शहरातील श्रीकांत पांगरकर (वय ४०) या माजी नगरसेवकालाही औरंगाबाद  येथील  दहशतवादी विरोधी पथकाने अटक केली आहे. पांगरकरला सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. नालासोपारा येथील वैभव राउत प्रकरणी ही चौथी अटक आहे. 

जालना शहरातील अंबड चौफुली येथे राहणारा असून एटीएसच्या पथकाने ही कारवाई केली आहे.  राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नालासोपार्‍यातील भंडारआळीमध्ये रहात असलेल्या वैभव  राऊत  याच्या  घर  आणि दुकानगाळ्यावर गुरुवारी छापा टाकून मोठ्या प्रमाणातील शस्त्रसाठ्यासह एटीएसने त्याला बेड्या ठोकल्या. तसेच याच परिसरातील एका इमारतीमधून त्याचा साथिदार कळसकर यालाही अटक केली. तर पुण्यातून सुधन्वा गोंधळेकर याला अटक केली होती. यात गुन्ह्यात स्फोटके आणि शस्त्रसाठा, महत्वाचे दस्तऐवज जप्त केले आहेत. या गुन्‍ह्यात पांगरकर याला अटक करण्यात आली आहे.