Sun, Jul 21, 2019 01:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हत्येची सुपारी देणार्‍या नगरसेवकाला राज्यमंत्री वाचवतोय

हत्येची सुपारी देणार्‍या नगरसेवकाला राज्यमंत्री वाचवतोय

Published On: Dec 23 2017 2:33AM | Last Updated: Dec 23 2017 1:26AM

बुकमार्क करा

नागपूर : विशेष प्रतिनिधी

कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून भाजपच्या डोंबिवलीतील एका नगरसेवकाने कल्याणच्या नगरसेवकाचा खून करण्यासाठी एक कोटी रूपयांची सुपारी दिली. या नगरसेवकाला वाचवण्यासाठी  सरकारमधील एक राज्यमंत्री प्रयत्न करतोय, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.

विधानसभेत विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत भाग घेताना विखे-पाटील यांनी हा आरोप  केला. नागपूरातील कुख्यात गुंड मुन्ना यादव हा नागपूरपासून हाकेच्या अंतरावरील एका फार्महाऊसवर लपलेला असताना पोलिसांना हा गुंड सापडत नाही. तसेच या गुंडाला मदत करणार्‍या कुकरेजाला पोलिसांनी ताब्यात घेवून त्याचे कॉल रेकॉर्ड तपासल्यास सत्य बाहेर येईल. याशिवाय नागपूरातील कायदा व सुव्यवस्था चांगली असल्याचे दाखविण्यासाठी पोलिसांकडून तक्रार घेतली जात नाही, असे विखे पाटील म्हणाले. अनिकेत कोथळे प्रकरणी गृहमंत्र्याने नाही तर किमान गृहराज्यमंत्र्याने राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी करत यापेक्षा कायदा व्यवस्था बिघडल्याचे दुसरे उदाहरण काय असू शकेल, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.