Mon, Jan 21, 2019 20:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पत्‍नीची हत्‍या करून पतीची आत्‍महत्‍या 

पत्‍नीची हत्‍या करून पतीची आत्‍महत्‍या 

Published On: Jul 05 2018 1:50AM | Last Updated: Jul 05 2018 1:50AMठाणे : प्रतिनिधी

पत्नीची हत्‍या करून पतीने स्‍वत:ही आत्‍महत्‍या केल्‍याची घटना ठाण्यातील साज सृष्‍टी बिल्डिंगमध्ये घडली. अजीत पुजारी असे आत्‍महत्‍या केलेल्‍या पतीचे नाव आहे तर प्रियांका पुजारी असे हत्‍या झालेल्‍या पत्‍नीचे नाव आहे. 

ठाण्यातील दिघार गाव कल्याण फाटा येथील साज सृष्‍टी बिल्डिंगमध्ये बुधवारी मध्यरात्री पती अजीत याने पत्‍नीची हत्‍या करताना मोबाईलमध्ये चित्रीकरण केले आणि नंतर स्‍वत:ही गळफास घेवून आत्महत्‍या केली. साज सृष्‍टी ल्डिंगमधील फ्लॅट क्रमांक १०४ मध्ये ही घटना घडली.