Tue, Jul 16, 2019 09:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे : मेहुण्याच्या शरीराचे तुकडे करून खून

ठाणे : मेहुण्याच्या शरीराचे तुकडे करून खून

Published On: Feb 07 2018 7:36PM | Last Updated: Feb 07 2018 7:35PMटिटवाळा : प्रतिनिधी

टिटवाळा पोलिस स्टेशनच्या मागे असलेल्याबी. पीटीच्या जागेत  सलमान चाळीच्या मागे ,धनगर वाडी परिसरात  तुकडे करून गोणीत भरलेला अज्ञात इसमाचा मृत्यूदेह सापडल्याच्या घटनेने एकाच खळबळ उडाली होती. मात्र अवघ्या सात दिवसात ठाणे ग्रामीण क्राईम ब्रँचने अगदी शिताफीने या गुन्ह्याची उकल करत आरोपींना जेरबंद केले आहे.

बी.पी.टी. परिसरात दि. ३० जानेवारी रोजी सायंकाळी ४:३० च्या सुमारास सुरक्षारक्षक असलेले कर्मचारी राउंडअपला असताना बाजूच्या परिसरातून दुर्गंधी सुटली होती. यावेळी परिसरात प्लास्टिकच्या  गोणीत काहीतरी बांधून टाकलेले आढळून आले. यानंतर याबाबत पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर पोलिसांनी गोणीची तपासणी केली असता त्यामध्ये एक कमरेखालील भाग नसलेले धड मिळाले. 

कसा केला तपास ? तपासादरम्यान मिसिंग दाखल  असलेल्या माहितीचा आढावा घेत असताना येथील सिद्धिविनायक कॉलनी परिसरांत राहणारा रविंद्र शिगवण (वय ३० ) हा इसम चार दिवसांपासून गायब असल्याचे समजले. त्या अनुषंगाने गायब इसमाची पत्नी सुषमा हिच्याकडे विचारणा केली असता तो आई-वडिलांकडे मुलुंडला गेल्याचे तिने सांगितले. मात्र संबंधित ठिकाणी तसेच त्या इसमाच्या कामावर चौकशी केली असता तो दि. २४ जानेवारीपासून कामावर नसल्याचे समजले.यानंतर गायब असलेल्या रविंद्र शिगवण यांच्या घरी पोलिस माहितीकरीता गेले असताना मृतदेहाच्या गोणीला येत असलेला दर्प त्यांच्या घरातही  जाणवत होता. तसेच भिंतीना पाण्याने धुत्ल्याचे आढळून आले. त्याचबरोबर मृतदेह सापडलेल्या गोणीला बांधण्यासाठी वापरलेली दोरी व घरात कपडे वाळवण्यासाठी असलेली दोरी यांच्यातदेखील साम्य आढळून आले. पोलिसांनी गुन्हा उघड करण्याच्या दृष्टीने समांतर तपास करत असताना गायब असलेल्या रविंद्र शिगवणचा मेहुणा गौतम मोहिते ( २९ ) याने सपोनि बडाख यांच्याकडे गुन्ह्याची कबुली दिली. त्याचदरम्यान रविंद्र शिगवणची पत्नी सुषमा व सासू अनिता मोहिते यांची चौकशी चालू असताना पत्नी सुषमा हिने देखील गुन्ह्याची कबुली दिली .

कसा घडला गुन्हा ?

मृत रविंद्र शिगवण व मृतचा मेहुणा यांच्यात दि. २४  जानेवारी रोजी  रात्री १०.३० च्या सुमारास जोरदार भांडण झाले. या भांडणात रविंद्र शिगवण  याने त्याच्या सासूच्या पोटात जोरदार लाथ मारली याचा गौतम मोहिते याला राग आला व त्याने रागाच्या भरात किचन ओट्याची फरशी रविंद्र शिगवणच्या डोक्यात घातल्यानंतर  तो जागीच गतप्राण झाला. यानंतर मृताची पत्नी , मेव्हुणा आणि सासू यांनी त्याचा मृतदेह घरातील बाथरूममध्ये ठेवला. यानंतर घरात जास्त वास येऊ लागल्याने मेहुणा गौतम मोहिते याने त्याचे तुकडे करून ते गोणीत भरून परिसरांत वेगवेगळ्या ठिकाणी टाकले.
या गुन्ह्यातील आरोपी मृताचा मेहुणा गौतम, पत्नी सुषमा व सासू अनिता यांना याला अटक केली करून कल्याण कोर्टात दाखल केले. यावेळी तिघांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिते वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी दिली.