Tue, Nov 20, 2018 13:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंब्रा-दिवा दरम्यान तांत्रीक बिघाड झाल्याने रेल्‍वे विस्‍कळीत

मुंब्रा-दिवा दरम्यान तांत्रीक बिघाड झाल्याने रेल्‍वे विस्‍कळीत

Published On: Dec 14 2017 11:03PM | Last Updated: Dec 14 2017 11:03PM

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी

मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा- दिवा दरम्यान दिवा स्थानकाच्या चार नंबर फलाटपासून अप जलद मार्गावरील थोड्या अंतरावरती  ओव्हरहेड वायर्स १० वाजून ३० मिनिटांच्या सुमारास तुटली. त्यामुळे अप- डाऊन मार्गावरील लोकल थांबवण्यात आल्या आहेत. घटनास्थळी रेल्वेचे कामगार उपस्थित झाले असून ओव्हरहेड वायर्स जोडण्याचे काम सुरू झाले आहे. काही वेळातच जलद मार्ग सुरू होईल असे रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. परंतु चाकारमाण्यांचे घरी जाण्याच्या वेळेतच वायर्स तुटल्याने प्रवाशांनी मुंब्र्या दरम्यान लोकलमधून खाली उतरून मुंब्रा आणि दिवा स्थानक गाठून पुढील प्रवास खासगी वाहणाने सुरू केला आहे, तर काही प्रवाशी लोकलमध्येच ताटकळत राहिले आहेत.