होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›  जोगेश्वरीमध्ये इमारतीवरून उड़ी घेत तरूणीची आत्महत्या

 जोगेश्वरीमध्ये इमारतीवरून उड़ी घेत तरूणीची आत्महत्या

Published On: Jun 26 2018 5:12PM | Last Updated: Jun 26 2018 5:12PMमुंबई : प्रतिनिधी 

जोगेश्वरीमधील एका उच्चभ्रू वसाहतीमधील ओबेरॉय स्पलेंडर बिल्डिंगच्या 18 व्या मजल्यावरून उडी घेत एका तरूणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्योती पाटेकर (वय 19) असे मृत तरूणीचे नाव असून, घटनेची नोंद मेघवाड़ी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी विक्रोळी  लिंक रोड, जोगेश्वरी पूर्व मुंबई येथे ओबेरॉय स्पलेंडर बिल्डिंगच्या १८ व्या मजल्‍यावर नितीन सेवाराम खन्ना, (वय 42 वर्षे) हे राहतात. यांचेकडे घरकाम करणारी मुलगी ज्योती हरिशचंद्र पाटेकर, (वय 19 वर्षे) हिने 18 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तिला होलिस्पिरीट हॉस्पिटल येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी दाखल पूर्व मयत म्‍हणून घोषित केले. या घटनेची नोंद मेघवाडी पोलीस ठाण्यात झाली असून, अधिक तपास चालू आहे.