Sun, Aug 18, 2019 20:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › MCA ने थकवले मुंबई पोलिसांचे १३ कोटी

MCA ने थकवले मुंबई पोलिसांचे १३ कोटी

Published On: Feb 20 2018 4:03PM | Last Updated: Feb 20 2018 4:31PMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबई पोलिस दलातील हजारों पोलिस क्रिकेट वर्ल्ड कपच्या बंदोबस्तासाठी जुंपले जातात  मात्र, त्या बंदोबस्ताचे शुल्क अदा करण्यात मुंबई क्रिकेट असोसिएशन चालढकल करत आहे. मागील 17 क्रिकेट स्पर्धेंकरिता पुरविण्यात आलेल्या पोलिस बंदोबस्ताचे रू 13.42 कोटी आजपर्यंत अदा केले नसल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुंबई पोलिसांनी दिली आहे. एनसीपी नेते शरद पवार आणि भाजपा नेते आशिष शेलार यांच्या पॅनलची निर्विवाद सत्ता मुंबई क्रिकेट एसोसिएशनमध्ये असल्यामुळेच मुंबई पोलिस सावधगिरी बाळगत आहे. असे बोलले जात आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलिसांकडे गेल्या 10 वर्षात संपन्न झालेल्या क्रिकेट स्पर्धेसाठी दिला गेलेला पोलिस बंदोबस्त आणि शुल्काची माहिती मागितली होती. जन माहिती अधिकारी आणि सहायक पोलिस आयुक्त (समन्वय) तानाजी सुरूलकर यांनी बंदोबस्त शाखेने दिलेली माहिती उपलब्ध करत कळविले की, 3 आयसीसी टी-20 क्रिकेट विश्वकप, महिला विश्वकप, सराव सामने, टेस्ट आणि वन-डे सामने असे 17 सामने खेळले गेले. या सामन्यांच्या शुक्लापायी 13 कोटी 41 लाख 74 हजार 177 इतकी रक्कम अदा करणे आवश्यक होती पण गेल्या 62 महिन्यांपासून ही रक्कम मुंबई क्रिकेट असोसिएशनने अदा केली नाही.

व्याज आकारले नाही

गेल्या 62 महिन्यापासून थकबाकी असलेली कोटयावधीची रक्कम वसूल करण्यासाठी जी कार्यवाही सुरु आहे त्या रक्कमेवर मुंबई पोलिसांनी कोणतेही व्याज आकारले नाही. रू 13.42 कोटीच्या थकबाकी रकमेवर व्याज न आकारण्यामुळे मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी वर्ष 2008 पासून 2011 या दरम्यान झालेल्या सामन्यांचे बंदोबस्त शुल्क रू 34 कोटी 33 लाख 44 हजार 618 अदा करण्यात आली आहे. या सामनाचे शुल्क इंडिया विन स्पोर्ट्स प्राईवेट लिमिटेडने वेळेवर अदा केले नसतानाही मुंबई पोलिसांनी कोणत्याही प्रकारचे व्याज वसूल केले नाही. अनिल गलगली यांनी यापूर्वी 2016 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस आयुक्त यांस पत्र पाठवूनही मुंबई पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.

अनिल गलगली यांच्या मते पोलिस बंदोबस्ताच्या बळावर अफाट नफा कमविणा-या मुंबई क्रिकेट एसोसिएशनने बंदोबस्त शुल्क ताबडतोब अदा करणे आवश्यक होते. सशस्त्र दलाच्या निष्काळजीपणामुळे शुल्क वसूल केले नसून, पोलिस आयुक्तांनी जबाबदार अधिकारीवर्गावर नियमाप्रमाणे कार्यवाही करत अशा सामन्यांचे शुल्क सामना संपताच वसूल करावे किंवा क्रिकेट स्पर्धा आयोजकांकडून आधीच शुल्क वसूल करावे. जेणेकरून पोलिसांस बंदोबस्ताचे शुल्क वसूलीचा मनस्ताप सहन करावा लागणार नाही. असे अनिल गलगली यांनी म्‍हंटले आहे.