Tue, Jun 02, 2020 20:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिष्यवृत्ती हवी? एक वर्ष सेवा बंधनकारक

शिष्यवृत्ती हवी? एक वर्ष सेवा बंधनकारक

Published On: Jan 06 2018 1:25AM | Last Updated: Jan 06 2018 12:41AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

राज्य सरकारच्या विविध विभागांमार्फत ज्या विद्यार्थ्यानी वैद्यकीय शिक्षणासाठी  शिष्यवृत्ती घेतली आहे, त्यांना सरकारकडे एक वर्ष सेवा करणे बंधनकारक करण्यात आले आहे.राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेणार्‍या अनुसूचित जाती व जमातीतील विद्यार्थांना फिची संपुर्ण रक्कम दिली जाते. विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांचीही संपूर्ण फिची रक्कम ही विमुक्त जाती, भटक्या जमाती , इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागामार्फत दिली जाते. तर याच विभागामार्फत इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या फिची 50 टक्के रक्कम दिली जाते. तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील विद्यार्थ्यांची 50 टक्के फिची रक्कम ही वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत दिली जाते.  जनतेच्या पैशातुन फिची ही रक्कम दिली जात असल्याने जनतेची सेवा एक वर्ष करणे त्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. तसे बंधपत्र त्यांना लिहून द्यावे लागणार आहे. 

राज्यातील दूर्गम, ग्रामीण व आदिवासी भागात अद्याप पुरेसे डॉक्टर्स उपलब्ध होत नसल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याने अशी सेवा करणे नाकारल्यास त्याला देण्यात आलेली शिष्यवृत्तीची रक्कम त्याला व्याजासह परत करावी लागणार आहे.