Tue, May 21, 2019 04:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मतदान सक्तीचे करा : मुख्यमंत्री 

मतदान सक्तीचे करा : मुख्यमंत्री 

Published On: Feb 09 2018 4:12PM | Last Updated: Feb 09 2018 4:12PMमुंबई : प्रतिनिधी

राज्य सरकारच्या कारभाराबाबत अनेकजण बोलतात. मात्र मतदानाला जात नाहीत. त्यामुळे मतदान करणेही कायदेशीर बंधनकारक व सक्तीचे करण्याबाबत निवडणूक आयोगाने विचार करावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्य निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या लोकशाही, निवडणूका आणि सुशासन परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज्यपाल सी.विद्यासागर, राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे.एस. सहारिया आदी उपस्थित होते.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्रित घेता येतील का याबाबत विचार होणे आवश्यक आहे. संविधानाने राज्य निवडणूक आयोगाला जे अधिकार दिले आहे त्याअंतर्गत आपण निवडणूक प्रक्रिया सुधारणेसाठी काय करू शकतो. याबाबत अभ्यास करून राज्य शासनाला अहवाल सादर करावा असे त्यांनी सांगितले.

प्रत्येक निवडणुकीत पैशाचा होणारा अतिवापर चिंताजनक आहे. जे लोक पॉलिसीवर नेहमी बोलतात ते मतदानाला जात नाहीत. त्यामुळे प्रश्नांवर मतदान झाले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.