होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वर्सोवा बीचवर आढळली कासवाची पिल्ले

वर्सोवा बीचवर आढळली कासवाची पिल्ले

Published On: Mar 22 2018 6:28PM | Last Updated: Mar 22 2018 6:28PMमुंबई : प्रतिनिधी

वर्सोवा बीचवर कासवाची घरटे आढळून आले आहे. बीच ओशन फाउंडेशनच्या अफरोज शहा यांना स्वच्छता अभियानादरम्यान कासवाचे घरटे आढळले. मादी कासवाकडून समुद्र किनार्‍यावर सुरक्षीत ठिकानी खड्डा खोदून त्‍याठिकानी मोठ्‍या प्रमाणात अंडी घातली जातात. दरम्‍यान स्‍वच्छता मोहिमेदरम्‍यान शहा यांना कासवाचे घरटे आढळून आले. या घरट्यातून  पिले बाहेर येताना दिसताच शहा यांनी वनविभागाला यासंबंधी माहिती दिली. 

मुंबईतील बीच ओशन फाउंडेशनच्या माध्यमातून वर्सोवा बीचच्या साफसफाईचे काम हाती घेण्यात आले होते. गेल्‍या काही महिण्यांपासून प्रत्येक आठवड्याला ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. यावेळी वर्सोवा बीचवर स्वच्छता मोहिम सुरू असताना अफरोज शहा यांना कासवाचे घरटे आढळले. या घरट्‍यातुन कासवाची पीले बाहेर येत असल्‍याचे दिसताचं त्‍यांच्या सुरक्षीततेसाठी शहा यांनी वनविभागाला फोन करून यासंबंधीची माहिती दिली. यानंतर शहा यांनी या कासवांच्या पिलांना वनविभागाकडे सुरक्षितपणे सुपूर्द केले.