Fri, Nov 16, 2018 05:27



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘त्या’ मुलीवर केईएममध्ये उपचार

‘त्या’ मुलीवर केईएममध्ये उपचार

Published On: Dec 16 2017 1:45AM | Last Updated: Dec 16 2017 1:45AM

बुकमार्क करा





मुंबई : प्रतिनिधी

शाळेत वही आणायला विसरल्याने 500 उठाबशा काढण्याच्या शिक्षेमुळे तब्येत बिघडलेल्या कोल्हापूरमधील भोतोली तालुक्यातील चंदगडमध्ये राहणारी शाळकरी मुलगी विजया चौगुले हिच्यावर आता मुंबईतील पालिकेच्या केईएम रुग्णालयात उपचार होणार आहेत. कोल्हापुरातील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रात्री उशिरा चौगुले कुटुंबीय मुंबईत पोहोचणार आहे. त्यानंतर तातडीने तिच्यावर उपचार सुरू करण्यात येणार आहे.

कोल्हापूर येथील कानूर बुद्रूकमधील भावेश्‍वरी संदेश विद्यालयातील मुख्याध्यापिकाने शाळेत वही आणायला विसरल्याच्या क्षुल्लक कारणावरून या मुलीला चक्क 500 ऊठाबशा काढण्याची शिक्षा दिली होती. शिक्षिकेच्या आदेशानुसार तिने 300 ऊठाबशा काढल्या आणि ती जमिनीवर कोसळली. त्यानंतर तिचे पाय कापायला लागले. मुलीची प्रकृती पाहता तिला तातडीने कोल्हापूरमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी सीटीस्कॅन, एमआरआय व अन्य शारीरिक चाचण्या केल्या. मात्र काहीच निदान झाले नाही. मुलीची प्रकृती पाहता रुग्णालयातील डॉक्टरांनी कुटुंबीयांना तिला मुंबईत हलवण्याचा सल्ला दिला.

डॉक्टरांच्या सल्लानुसार या मुलीचे वडील निवृत्ती चौगुले यांनी मुंबईतील पालिकेच्या केईएम रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांना संपर्क साधून उपचाराची विनंती केली. त्यानुसार शुक्रवारी कोल्हापूर येथील रुग्णालयातून डिस्चार्जची सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून रुग्णवाहिकेद्वारे तिला मुंबईत आणण्यात येत आहे. त्यानुसार आता या मुलीवर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार होणार आहेत.