Tue, Nov 20, 2018 21:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तिसरी बम्बार्डिअर लोकल आजपासून धावणार मध्य रेल्वेवर

तिसरी बम्बार्डिअर लोकल आजपासून धावणार मध्य रेल्वेवर

Published On: Jan 06 2018 1:25AM | Last Updated: Jan 06 2018 1:11AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

मध्य रेल्वेवर 6 जानेवारीपासून तिसरी बम्बार्डिअर धावणार आहे. या गाडीच्या 13 फेर्‍या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेवर बम्बार्डिअर लोकलच्या एकूण 34 फेर्‍या होतील.
अधिक हवेशीर आणि नव्या तंत्रज्ञानाच्या बम्बार्डिअर लोकलच्या 18 डिसेंबरपासून 12 फेर्‍या, 26 डिसेंबरपासून 9 फेर्‍या तर आता शनिवारी 6 जानेवारीपासून आणखी एक बम्बार्डिअर दाखल होऊन तिच्या 13 फेर्‍या चालवण्यात येत आहेत. 

या तिसर्‍या बम्बार्डिअर लोकलची पहिली फेरी विद्याविहारहून सकाळी 5.39 वाजता सुटून कल्याणला सकाळी 6.35 वाजता पोहचेल. दुसरी फेरी कल्याणहून सकाळी 6.48 वाजता सुटून दादरला 8 वाजता पोहचेल. तिसरी फेरी दादरवरून सकाळी 8.07 वाजता सुटून ठाण्याला 9.16 वाजता पोहचेल. चौथी फेरी कल्याणवरून सकाळी 9.22 वाजता सुटून सकाळी 10.52 वाजता सीएसएमटीला पोहचेल. पाचवी फेरी सीएसएमटीहून सकाळी 10.56 वाजता सुटून कुर्लाला सकाळी 11.26 वाजता पोहचेल. सहावी फेरी कुर्लाहून सायंकाळी 4.36 वाजता सुटून सीएसएमटीला सायंकाळी 5.08 वाजता पोहचेल. सातवी फेरी सीएसएमटीहून सायंकाळी 5.12 वाजता सुटून कल्याणला सायंकाळी 6.42 वाजता पोहचेल. आठवी फेरी कल्याणहून सायंकाळी 6.51 वाजता सुटून सीएसएमटीला रात्री 8.18 वाजता पोहचेल. नववी फेरी सीएसएमटीहुन रात्री 8.22वाजता सुटून रात्री 9.40 वाजता डोंबिवलीला पोहचेल. दहावी फेरी डोंबिवलीहून रात्री 9.59 वाजता सुटून सीएसएमटीला रात्री 11.19 वाजता पोहचेल तर शेवटची अकरावी फेरी रात्री 11.25 वाजता सुटून कुर्ल्याला रात्री 11.53 वाजता पोहोचेल.