Sun, Sep 23, 2018 22:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत 'सोफिया'ला पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड (व्‍हिडिओ)

मुंबईत 'सोफिया'ला पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड (व्‍हिडिओ)

Published On: Dec 30 2017 3:18PM | Last Updated: Dec 30 2017 5:53PM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

यंदाच्या ‘टेकफेस्ट’मध्ये सौदी अरेबियाचे नागरिकत्व मिळाविलेल्या ‘सोफिया’ या रोबोची उपस्थिती सर्वाधिक आकर्षणाचा विषय ठरला आहे.  या रोबोला पाहण्यासाठी आयआयटीत तरुणाईची गर्दी उसळली आहे, दीक्षांत सभागृहात सोफिया बोलणार आहे, या सभागृहाच्या बाहेर विद्यार्थ्यांनी गर्दी केली आहे..तब्बल 1 ते दीड किलोमीटरची रांग लागली आहे.

एका देशाचे पूर्ण नागरिकत्व मिळविणारी ‘सोफिया’ ही जगातील पहिली आणि सध्या एकमेव मानवीय रोबो आहे.