Mon, Mar 25, 2019 09:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मध्यरात्रीपासून एसटीची १८ टक्के भाडेवाढ

मध्यरात्रीपासून एसटीची १८ टक्के भाडेवाढ

Published On: Jun 15 2018 8:10AM | Last Updated: Jun 15 2018 8:10AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

एसटी बसच्या तिकीट दरात आजपासून (दि. १५) १८ टक्के दरवाढ होणार आहे. आज मध्यरात्रीपासून या दरवाढीची अंमलबजावणी होणार आहे. दरवाढीच्या योग्य अंमलबजावणीसाठी १५ ते १८ जून या कालावधीत एसटीच्या अधिकाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून, मुख्यालयात हजर राहण्याचे अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.

डिझेलच्या दराव झालेली वाढ आणि एसटी कामगारांची नुकतीच करण्यात आलेली वेतनवाढ यामुळे एसटीच्या प्रशासकीय खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ही तिकीट दरवाढ करण्यात येत असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.

या दरवाढीबरोबरच तिकीटाचे भाडे आकारणी ही पाच रुपयांच्या पटीने करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. एखाद्या प्रवासाचे तिकीट सात रुपये असेल तर त्‍याच्याकडून सात रूपयांऐवजी पाच रुपये आकारले जातील आणि आठ रुपये तिकीट असल्यास प्रवाशकडून दहा रुपये तिकीटदर आकारला जाईल. बसमध्ये सुट्ट्या पैशांसाठी प्रवासी आणि वाहकांमध्ये कायम वाद होत असल्‍याच्या अनेक घटना समोर आल्‍या आहेत. तिकीटाचे भाडे पाच रूपयांच्या पटीने आकारण्याच्या या निर्णयामुळे सुट्टया पैशांचा प्रश्न सुटेल असे एसटी महामंडळाची म्‍हणणे आहे.